सकाळी झालेल्या जोरदार घसरणीनंतर शेअर बाजार (Share Market) पुन्हा सावरला
सेन्सेक्सने पुन्हा एकदा 60 हजार अंकांवर बंद झाला असून निफ्टीने पुन्हा एकदा 18 हजार अंकांचा टप्पा ओलांडला
बाजार बंद होताना निर्देशांकात घसरण दिसून आली.
मात्र, सकाळच्या तुलनेत शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 224.11 अंक म्हणजे 0.37 टक्क्यांची घसरणीसह 60,346 अंकांवर बंद झाला
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 66.30 अंक म्हणजे 0.37 टक्क्यांच्या घसरणीसह 18,003 अंकांवर बंद झाला
आज शेअर बाजारातील व्यवहारात आयटी, ऑटो, रियल्टीच्या शेअर दरात विक्रीचा जोर दिसला
बँकिंगसह मेटलच्या शेअर दरात तेजी दिसून आली
निफ्टी बँक निर्देशांकात बाजार बंद होताना 500 अधिक अंकांची तेजी दिसून आली
सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 4.28 टक्क्यांची तेजी दिसली