पॅनकार्ड हे सध्या महत्त्वाचे दस्ताऐवज म्हणून ओळखले जाते. बँकिंग आणि इतर आर्थिक व्यवहारासाठी पॅनकार्ड अनिवार्य असते. पॅनकार्डचे निगडीत काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. भारतात एका व्यक्तीच्या नावे एकच पॅनकार्ड जारी केले जाते. कोणतीही व्यक्ती एकहून अधिक पॅनकार्ड अथवा Duplicate Pan Card बाळगू शकत नाही. असा गैरप्रकार कोणी केल्याचे आढळल्यास त्या व्यक्तीला दंड भरावा लागू शकतो. पॅनकार्डमध्ये पॅन क्रमांक आणि कार्डधारकाचे नाव, जन्म तारीख आणि फोटोचा समावेश असतो. आयकर विभागा नियमानुसार, एक व्यक्ती एकहून अधिक पॅनकार्ड बाळगू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला दोन पॅनकार्ड असल्याचे आढळल्यास त्याला आयकर कायद्यानुसार दंड ठोठावला जावू शकतो दोषी व्यक्तीला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.