अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला
प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्समध्ये एक हजार अंकांची घसरण दिसून आली
निफ्टी तब्बल 298 अंकांची मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेत पुन्हा महागाई वाढल्याने अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाली होती
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,153.96 अंकांनी म्हणजे जवळपास 1.91 टक्क्यांच्या घसरणीसह 59,417 अंकांवर खुला झाला
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 298.90 अंकांनी म्हणजे 1.65 टक्क्यांच्या घसरणीसह 17,771 अंकावर खुला झाला
प्री-ओपनिंगनंतर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर बाजार पुन्हा सावरू लागला
सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 560 अंकांच्या घसरणीसह 60,011.05 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी 159 अंकांच्या घसरणीसह 17,910.80 अंकांवर व्यवहार करत होता
सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 5 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली
उर्वरित 25 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली