दिवाळीचा सण नुकताच पार पडला. या दरम्यान ग्राहकांनी सोन्या-चांदीची भरपूर खरेदी केली.



या कालावधीत सोन्या-चांदीच्या दरातही (Gold-Silver Rate) घसरण दिसून आली.



हाच दर कायम ठेवत ग्राहकांना आजही सोने-चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे.



याचं कारण म्हणजे, जागतिक बाजारात महागड्या धातूंच्या किमतीत झालेल्या घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून आला.



आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,420 रूपयांवर आला आहे.



22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,218 वर पोहोचला आहे.



सोन्याचे हे दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह इतर शहरांत देखील सारखे पाहायला मिळाले.



तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.



यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.