या आठवड्यातील व्यवहाराचा शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी (Indian Share Market) काळा दिवस ठरला.
आज सकाळपासून सुरू झालेली घसरण कायम राहिल्याने हाहा:कार उडाला
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 60 हजार अंकांखाली आला असून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 18 हजार अंकांखाली घसरला.
बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार रडकुंडीला आले.
आज शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स 980 अंकांच्या घसरणीसह 59,845 अंकांवर स्थिरावला.
निफ्टी निर्देशांक 320 अंकांच्या घसरणीसह 17,806 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजारात आलेल्या सुनामीमुळे एकाच दिवसात 8.20 लाख कोटींचा चुराडा झाला.
गुरुवारी बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा बीएसईवरील लिस्टेड कंपनीचा मार्केट कॅप 280.53 लाख कोटी रुपये होता.
शुक्रवारी बाजारात झालेल्या घसरणीमुळे मार्केट कॅप 272.37 लाख कोटी इतका झाला
बाजारात आज आलेल्या सुनामीत सगळ्याच सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला.