भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीने झाली आहे.
शेअर बाजारात (Share Market) नफावसुलीचे संकेत दिसत असून बाजारातील घसरण कायम राहण्याची शक्यता आहे.
भारतीय शेअर बाजारासाठी एसजीएक्स निफ्टी निर्देशांकाकडून (SGX Nifty) नकारात्मक संकेत मिळत होते.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 197 अंकांच्या घसरणीसह 61,608.85 अंकांवर खुला झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 80.15 अंकांच्या घसरणीसह 18,340.30 अंकांवर खुला झाला.
सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 447 अंकांच्या घसरणीसह 61,358.41 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी 119 अंकांच्या घसरणीसह 18,301.05 अंकांवर व्यवहार करत होता
सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी फक्त एकाच कंपनीच्या शेअर दरात किंचीत तेजी दिसून आली
सेन्सेक्समध्ये अॅक्सिस बँकेच्या शेअर दरात तेजी दिसली होती
एचडीएफसी, भारती एअरटेल, पॉवरग्रीड, टाटा मोटर्सच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.