गेल्या 15 दिवसात चांदीच्या किंमतीत झपाट्याने चढ उतार दिसत आहे. आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीं कालच्या प्रमाणेच जैसे थे आहेत. तर चांदीच्या किंमतींमध्ये 300 रुपयांची वाढ झाली आहे. 22 कॅरेटसाठी सोन्याची किंमत 50,100 रुपये प्रति तोळा आहे. 24 कॅरेटसाठी सोन्याची आजची किंमत अंदाजे 54640 रुपये प्रती तोळा आहे. सराफा बाजारात आज चांदीचे दर अंदाजे 69300, रुपये प्रती किलोंच्या घरात आहेत. काल त्या अंदाजे 69000 रुपये प्रती किलो होत्या. कालच्या तुलनेत त्यात तब्बल 300 रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन बुलियन्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार, आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.