शेअर बाजारात आज तेजीचे संकेत दिसत आहेत
शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर काही वेळेतच सेन्सेक्सने (Sensex) 61 हजार अंकांचा टप्पा ओलांडला
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 67.99 अंकांच्या तेजीसह 61,405.80 अंकांवर खुला झाला
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 19.10 अंकांच्या तेजीसह 18,288.10 अंकांवर खुला झाला.
शेअर बाजारात आज तेजीचे संकेत दिसत आहेत.
शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर नफावसुलीने काही प्रमाणात निर्देशांकात घसरण दिसली
त्यानंतर बाजार सावरला. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 93 अंकांच्या तेजीसह 61,431.69 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी 23.35 अंकांच्या तेजीसह 18,292.35 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी 50 मधील 35 कंपन्यांचे शेअर तेजीत दिसून आले. तर, 15 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली
सेन्सेक्स निर्देशांकात समावेश असणाऱ्या 30 पैकी 21 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे