गेल्या आठवडाभरात जागतिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) घसरण पाहायला मिळाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमती कमी झाल्याचा हा परिणाम आहे. हेच दर कायम ठेवत आज सोन्याच्या दरात काहीही फरक पडलेला नाही.

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 54,330 रूपयांवर आला आहे.

आज एक किलो चांदीचा दर 67,500 रूपयांवर व्यवहार करत आहे.

सोन्या-चांदीचे हे दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह, दिल्ली कोकत्त्यातही सारख्या दराने पाहायला मिळाले.

स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% कमी होऊन $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.3% कमी होऊन $1,796.50 वर होते.

स्पॉट सिल्व्हर 0.6% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले.

BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता.