आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारावर दबाव दिसत आहे.
सेन्सेक्स 61500 पर्यंत घसरला आहे. निफ्टी 18300 च्या खाली पोहोचला.
बँक निफ्टीही 43300 च्या खाली घसरला. शेअर बाजारात शुक्रवारी सकाळी मोठ्या घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली,
शेअर बाजार शुक्रवारी सेन्सेक्स 265 अंकांनी घसरून 61,534 वर उघडला
निफ्टी 96 अंकांनी घसरून 18,319 वर उघडला. बाजारात व्यवहाराला सुरुवात होताच सेन्सेक्स आणि निफ्टीने वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
जागतिक बाजारातील तीव्र घसरणीचाही गुंतवणूकदारांवर परिणाम झाल्याचे दिसून आलं.
सकाळी 9.32 वाजता, सेन्सेक्सने 82 अंकांच्या वाढीसह 61,881 वर व्यवहार करण्यास सुरुवात केली,
तर निफ्टी 24 अंकांनी चढून 18,439 वर पोहोचला.
बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा, एमएफसीजी यांसारख्या क्षेत्रांमध्ये घसरण पाहायला मिळाली.
पावर, मीडिया, रिअल इस्टेट आणि इन्फ्रा क्षेत्रातील शेअर्समध्ये मात्र तेजी दिसून येत आहे.