सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ पाहायला मिळाली. मात्र, आज ग्राहकांना सोने-चांदी खरेदीसाठी चांगली संधी आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याने त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला आहे.

सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांना सोन्या-चांदीची खरेदी करणे परवडत नसल्याने अनेकांनी सोनं खरेदीसाठी पाठ फिरवली होती.

काही ग्राहकांनी तर वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली होती. मात्र, आता बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी पुन्हा पाहायला मिळतेय.

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 54,070 रूपयांवर आला आहे.

आज एक किलो चांदीचा दर देखील कमी झाला आहे. काल चांदीचा दर 67,790 रूपयांवर व्यवहार करत होता. आजचा दर 67,330 रूपये आहे.

स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन $1,796.50 वर होते.

इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.

अशा प्रकारे तुम्ही खरेदी केलेल्या दागिन्यांची तुम्ही शुद्धता तपासून पाहू शकता.