सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर आज भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) विक्रीचा दबाव असल्याचे दिसून येत आहे
भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात आज घसरणीसह झाली.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने (Federal Reserve) केलेल्या व्याज दरवाढीनंतर शेअर बाजारात घसरण दिसून आली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 74 अंकांच्या घसरणीसह 62,603 अंकांवर खुला झाला.
निफ्टी (Nifty) निर्देशांक 18 अंकांच्या घसरणीसह 18,642 अंकांवर खुला झाला.
त्यानंतर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू झाला.
सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 276 अंकांच्या घसरणीसह 62,401.47 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी निर्देशांक 80 अंकांच्या घसरणीसह 18,580.10 अंकांवर व्यवहार करत होता.
बँक निफ्टी, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, रिअल इस्टेट, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये तेजी
आयटी, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सेक्टरमध्ये घसरण