सोन्या-चांदीच्या दरात मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळतेय.

जागतिक बाजारात सध्या वाढत चाललेली महागाई आणि त्यानंतर आगामी काळात मंदीची लाट येण्याचा अंदाज पाहता अनेकांनी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोनं खरेदीकडे कल वाढवला आहे.

याचाच परिणाम म्हणून जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत मोठी वाढ निर्माण झाली आहे.

सुवर्णनगरी जळगावातही सोन्याच्या दराने मोठी उच्चांक पातळी गाठली आहे. जळगावात 24 कॅरेट सोन्याचा दर 58 हजारांच्याही पुढे गेला आहे.

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,830 रुपये आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 52,094 रुपयांवर व्यवहार करत आहे.

लग्नसराईचे दिवस त्यात सोन्याचे वाढलेले दर यामुळे ग्राहकांनी भारदस्त सोनं खरेदी करण्यास मुरड घातली आहे,.

काल एक किलो चांदीचा दर तब्बल 69 हजारांवर व्यवहार करत होता.

इंडियन बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.

BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.