जान्हवी कपूर आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. आजघडीला तिची आई-दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी हयात असत्या, तर त्यांना आपल्या मुलीच्या यशाचा अभिमान वाटला असता.
आपल्या मुलीने अभिनेत्री व्हावे अशी श्रीदेवीची इच्छा नव्हती. त्यांनी त्यांच्या मुलीसाठी वेगळेच स्वप्न पाहिले होते.
जान्हवीला बालपणापासून घरात फिल्मी वातावरण पाहायला मिळाले. जसजशी ती मोठी होत गेली, तसतशी जान्हवीनेही अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहण्यास सुरुवात केली.
मात्र, स्वत: या झगमगाटी दुनियेचा एक भाग असलेल्या आई श्रीदेवी यांना आपल्या मुलीला डॉक्टर बनवायची इच्छा होती.
आपल्या मुलीने मेहनतीने अभ्यास करावा आणि डॉक्टर व्हावे, अशी श्रीदेवीची नेहमीच इच्छा होती.
मात्र, जान्हवीने अभिनय क्षेत्र निवडले आणि 2018 मध्ये बॉलिवूड डेब्यू करत पहिलाच हिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्रीने अल्पावधीतच अनेक हिट चित्रपट दिले.
जान्हवीने आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे. (Photo : @ janhvikapoor/IG)