दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजवर दोन विकेट राखून विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत स्थान मिळवलंआहे.
स्पर्धेचं यजमानपद भूषवणाऱ्या वेस्ट इंडिज आणि अमेरिकेचा संघ स्पर्धेतून बाहेर गेले आहेत.
तर ग्रुप-2 मधून दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंडचा संघाने उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे.
आज दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजवर अटीतटीच्या लढतीत दोन विकेट राखून विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत स्थान मिळवलं.
आज रात्री भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्यास उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
आणि भारत उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
भारताने आज ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध सामना खेळावा लागेल.
म्हणजे 27 जूनला होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंडचा संघ आमनेसामने असतील.
त्यामुळे आजच्या या महत्वाच्या सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.