शिखर धवनला पंजाब किंग्स संघाची कर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती.
परंतु हंगामाच्या मध्यात दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यायला लागली.
शिखर धवन बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियात पुनरागमन करू शकला नाही .
सध्या क्रिकेटपासून दूर असलेला शिखर धवन त्याच्या शोमुळे चर्चेत आहे.
या शोमध्ये धवनने स्वतःशी संबंधित एका अफवेबद्दल खुलासा केला.
शिखरने एकदा एक अफवा एकली होती की, तो भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजसोबत लग्न करत आहे.
मिताली राज महिला प्रीमियर लीगमधील गुजरात जायंट्सची मार्गदर्शक आहे.
शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट झाला आहे.
हे प्रकरण न्यायालयात असतानाही त्यावर बरीच चर्चा झाली. धवन आणि आयशा यांचा ऑक्टोबरमध्ये घटस्फोट झाला.
नऊ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.