पाकिस्तान विरुद्ध यूएसएच्या मॅचची सर्वच आतुरतेने वाट पाहत होते.
ही मॅच पाकिस्तानसाठी खूप मोठे आव्हान नव्हते.
परंतु टी20 विश्वचषकात अमेरिकेनं सर्वात मोठा उलटफेर केला आहे.
सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेनं पाकिस्तानचा पराभव करत इतिहास रचला आहे.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 159 धावांपर्यंत मजल मारली होती.
प्रत्युत्तरदाखल अमेरिकेचा संघही 159 धावांपर्यंतच पोहचू शकला.
अमेरिकाने सुपर ओव्हरमध्ये शानदार कामगिरी केली.
सुपर ओव्हरमध्ये मोहम्मद आमीर यानं वाईड चेंडू फेकले, हेच पाकिस्तानच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं.
अमेरिकाकडून सौरभ नेत्रावळकर यानं सुपर ओव्हरमध्ये शानदार गोलंदाजी केली.
सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने 19 धावांचा यशस्वी बचाव केला.