काल मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात सामना रंगला.
या सामन्यात लखनौ संघाने 18 धावांनी विजय मिळवला.
लखनौने प्रथम खेळताना पूरणच्या खेळीमुळे 214/6 धावा केल्या.
मुंबई संघ केवळ 196 धावा करू शकला.
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला षटकाचा वेग कमी ठेवल्याने बीसीसीआयने दंड ठोठावला आहे.
हा मुंबई संघाचा हंगामातील तिसरा गुन्हा होता.यामुळे पांड्याला 30 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
हार्दिक पंड्याला संघाच्या पुढील सामन्यात खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे.
म्हणजेच या बंदीमुळे हार्दिक आयपीएल 2025 चा सलामीचा सामना खेळू शकणार नाही. ही बंदी पुढील वर्षापासून लागू होणार आहे.
जर त्या कर्णधाराने आयपीएलच्या सीझनमध्ये दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटचा गुन्हा केला तर त्याला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला जातो
तिसऱ्यांदा चूक झाल्यास संबंधित कर्णधारावर एका सामन्याची बंदी घालण्यात येते.