'जेम्स वॉट' या शास्त्रज्ञाने वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावला होता. या सोबतच विज्ञान जगतात एका शब्दाचा देखील शोध लागला. तो शब्द होता 'हॉर्स पॉवर'. याच शब्दाने त्यांनी आपल्या इंजिनाच्या शक्तीची तुलना घोड्याच्या शक्तीशी केली. याकरिता जेम्स वॉट ने एक प्रयोग देखील केला होता. याच प्रयोगाच्या आधारे त्यांनी हॉर्स पॉवरचं मानक ठरवलं. घोड्याची ताकत जाणून घेण्यासाठी त्यांनी एका रस्सी एका बाजूने घोड्यावर बांधले. त्याच्या दुसऱ्या बाजूला एका कप्पीच्या आधाराने वजन बांधले. घोड्याच्या वजनाला 1 सेकंदात 1 फूट वरती उचललं गेल्यावरच हॉर्स पॉवर मानक ठरवलं गेलं. '1 हॉर्स पॉवर' मध्ये '746 Watt' असतात.