साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्याकरता चार ते पाच लवंग ठेवा.

सुकं खोबरं तुरडाळीत ठेवलं तर खराब होत नाही.

लिंबाच्या जास्त रसासाठी काही मिनिटे लिंबू गरम पाण्यात भिजवून ठेवा.

तांदूळ पाण्यात भिजवून ठेवला तर तांदळाचा दाणा मोकळा होतो.

चिमटीभर हळद पाण्यात घातल्यास ते लवकर उकडतात.

तुरीच्या डाळीत हिंग घातल्यास हिंगाचा वास टिकून राहतो.

तांदळात कडूनिंब घातल्यास त्याला किड लागत नाही.

भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतलं लोहं टिकून राहत.

भेंडीच्या भाजीत दही घातल्याने भाजी चिकट होत नाही.

लिंबाचे डाग घालवण्यासाठी त्यावर आल्याचा तुकडा घासावा.