साऊथ क्वीन सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन आयोजित केले होते, ज्यामध्ये चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले होते.

यावेळी चाहत्यांनी तिला तिच्या टॅटूशी संबंधित प्रश्नही विचारले होते. एका चाहत्याने समांथाला विचारले की, ‘तुम्हाला टॅटूची कोणतीही कल्पना कधीतरी ट्राय करून पहायची आहे का?’

या प्रश्नाला उत्तर देताना समंथाने स्वत:चा एक व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे की, ‘तुम्हाला माहीत आहे का की,

तरुणपणात मला स्वत:ला सल्ला द्यायचा असता तर मी म्हणाले असते की, शरीरावर कधीही टॅटू काढू नका. कधीही, कधीही नाही...’

समंथाच्या शरीरावर तीन टॅटू आहेत. यातील एक टॅटू तिच्या पाठीवर आहे, ज्यामध्ये YMC म्हणजेच ‘ये माया चेसावे’ असे लिहिले आहे.

हे तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट 2010 मध्ये रिलीज झाला होता, ज्यामध्ये तिचा माजी पती नागा चैतन्यने देखील मुख्य भूमिका साकारली होती.

समंथाचा आणखी एक टॅटू तिच्या बरगडीवर आहे, ज्यामध्ये Chay लिहिले आहे.‘चाय’ हे नागा चैतन्यचे टोपणनाव आहे.

नागासोबत ब्रेकअप झाल्यानंतर समंथाला कदाचित हा टॅटू काढल्याचा पश्चाताप होत असावा. हे अभिनेत्रीच्या व्हिडीओवर लक्षात येत आहे.