रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नसोहळ्यातील सुंदर फोटो व्हायरल होताहेत नवविवाहीत जोडप्याच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये रणवीर आलिया एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचं पाहायला मिळतंय दोघांचे रोमँटीक फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय हा फोटो रणवीर आणि आलियाच्या 'वेडिंग डे'चा आहे. लग्नाचे विधी पूर्ण केल्यानंतर दोघांनीही केक कापून आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. लग्नाच्या दिवशी आलियानं हा फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. आलियाच्या मेहंदीचाही एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघंही अत्यंत सुंदर दिसत आहेत. दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भटनं 14 एप्रिलला आपली लग्नगाठ बांधली.