गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात कमालीची घसरण होत असल्याने बळीराजाच्या हाती काही मिळत नाही. पैठणच्या बाजार समितीत कांद्याला 100 रुपये क्विंटल हा नीचांकी भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पैठणच्या बाजार समितीत कांद्याला 100 रुपये क्विंटल हा नीचांकी भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले. गेल्या पाच वर्षांनंतर पुन्हा कांदा 100 रुपये क्विंटलवर आला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आवक सतत वाढत असून वाढत्या आवक झाल्यामुळे कांद्याच्या भावावर परिणाम झाला आहे. पैठण बाजार समितीत इतर ठिकाणांहूनदेखील कांद्याची आवक सुरू आहे. कांद्याला पाच दिवसांपूर्वी 200 ते 900 रुपये भाव मिळाला होता. मात्र सततची वाढती आवक यामुळे कांद्याला 240 वरून थेट दोन दिवसांत 100 रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे.