सई पल्लवीने अभिनयाच्या जोरावर एक वेगळाच ठसा उमटवलाय. तिच्या सिंपल लूकमुळे ती अधिक खुलून दिसते. सई पल्लवीने साऊथमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 'प्रेमम'मध्ये तिने 'मलर'ची भूमिका साकारली होती. हा चित्रपट अनेकांच्या काळजात घर करुन आहे. 'मारी' हा सुपरहिट चित्रपट तिने दिला आहे. साडीमध्ये सईचे सौंदर्य हे अधिकच खुलून दिसतं. सईने तामिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटात काम केलंय. सई पल्लवी ही नेहमी मेक-अप विना दिसते. ती कोणत्याही सौंदर्यप्रसाधनाच्या जाहिरातीत काम करत नाही.