रॅपर बादशाहने नुकतीच एक महागडी कार खरेदी केली आहे. बादशाहाने 'ऑडी Q8' (Audi Q8) ही कार खरेदी केली आहे. या कारची किंमत 1 कोटी 23 लाख रुपये आहे. बादशाहने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. बादशाहने कारसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अनेक सेलिब्रिटींसह चाहतेदेखील बादशाहच्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. फोटो शेअर करत बादशाहाने लिहिले आहे, ऑडी Q8 या कारसोबत एक नवा प्रवास सुरू करण्यास मी उत्सुक आहे. रॅपर बादशाहकडे फक्त ऑडीच नव्हे तर अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. ऑडी कारचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लो यांनीदेखील त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून बादशाहाचा कारसोबतचा फोटो शेअर केला आहे. बादशाहाचा चाहतावर्ग हा तरुणवर्ग आहे.