सौरव गांगुलीची मुलगी सना हिने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेय. मुलीच्या पदवी समारंभाचे फोटो सौरव गांगुलीने सोशल मीडियावर पोस्ट केलेत. सौरव गांगुलीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सना गांगुलीने इंग्लंडमधील युनिवर्सिटी कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतलेय. 2020 मध्ये सनाने या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. सनाने शिक्षण घेतलेले इंग्लंडचे हे कॉलेज 200 वर्ष जुने रिपोर्ट्सनुसार, सना गांगुलीने इकॉनॉमिक्समधून पदवीचं शिक्षण घेतलेय. सना गांगुली डान्सरही आहे. सौरव गांगुली सोशल मीडियावर सनासोबतचे फोटो वारंवार शेअर करत असतो. सना गांगुली नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.