भोंगा आणि हनुमान चालिसा वाद सध्या देशभरात चर्चेत आहे.

भोंगा आणि हनुमान चालीसा वादावर अभिनेता सोनू सूदनेदेखील भाष्य केले आहे.

देशात सुरू असलेल्या या वादामुळे सोनू सूदला प्रचंड दु:ख होत आहे.

पुण्यात पार पडलेल्या JITO कनेक्ट 2022 समिट दरम्यान सोनू सूदने भोंगा आणि हनुमान चालीसा वादावर भाष्य केलं आहे.

सोनू सूद नेहमीच देशात सुरू असलेल्या अनेक समस्यांवर भाष्य करत असतो.

लोकांनी आता धर्म आणि जातीचं बंधन तोडायला हवं, असंदेखील सोनू सूद म्हणाला.

भोंगा आणि हनुमान चालीसा वादावर सोनू सूद म्हणाला, कोरोना काळात लोकांनी धर्म बाजूला ठेवला आणि एकमेकांना मदत केली.

समाजात फक्त माणुसकी आणि बंधुता पाहायला मिळावी, असं वाटत असेल तर भोंगा आणि हनुमान चालीसा वाद संपायला हवा, असंही सोनू म्हणाला.

अनेक लोक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सोनू सूदकडे मदत मागत असतात.

'फतेह' आणि 'पृथ्वीराज' हे सोनू सूदचे आगामी सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.