देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्याशिवाय कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनबाधितांमध्येही वाढ होत आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगमला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच बरोबर सोनूच्या पत्नीला आणि मुलाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. नुकताच सोशल मीडियावर सोनूने एक व्हिडीओ शेअर केला.



इन्स्टाग्रामवर सोनूने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनूने चाहत्यांना सांगितले, 'सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा मला कोरोनाची लागण झाली आहे, अनेकांना ही गोष्ट माहित नसेल. मी आत्ता दुबईमध्ये आहे.

सोनू पुढे म्हणाला 'मी भुवनेश्वर येथे परफॉर्म करण्यासाठी आणि सुपर सिंगर-3 च्या शूटींगसाठी भारतात येणार होतो. त्याआधी मी टेस्ट केली. तेव्हा मला कळाले की मला कोरोनाची लागण झाली आहे. सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या. '



सोनूने गायलेल्या गाण्यांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते.

त्याच्या संदेसे आते है, तुमसे मिल्के दिलका, दो पल आणि मै अगर कहूं या गाण्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.



(photo:@sonunigamofficial/IG)

(photo:@sonunigamofficial/IG)