पंजाबमधील फिरोजपूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची सभा रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी दिल्लीला परतले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता, ते पंजाबमधील तेथील जनतेला संबोधित करणार होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे देखील या रॅलीत सहभागी होणार होते. पंजाबच्या फिरोजपूरमधील रॅली रद्द करण्यावर केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी माहिती दिली. (Photo:@ANI)