छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सध्या प्रचंड चर्चेत आहे.



यातील अनेक कलाकारांनी आता मालिकेला रामराम केला आहे. मात्र, या मालिकेतून बाहेर पडल्यानंतरही कलाकार प्रचंड चर्चेत असतात.



यापैकीच एक नाव म्हणजे निधी भानुशाली (Nidhi Bhanushali).



निधीने या मालिकेत ‘भिडे मास्तरां’ची लेक ‘सोनू’ची भूमिका केली होती.



अर्थात काही कारणास्तव तिने काही वर्षांपूर्वी ही मालिका सोडली आहे. मात्र, तरीही चाहते तिला ‘सोनू’ म्हणूनच ओळखतात.



‘सोनू’ साकारणारी अभिनेत्री निधी भानुशाली तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.



तिने शो सोडल्याला आता 2 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण असे असूनही निधी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते.



निधी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.



ती तिचे अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून, चाहत्यांच्या हृदयाचा ठोका वाढवत असते.



अभिनेत्रीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम पेजवर असा एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून चाहत्यांचे मन घायाळ झाले आहे.