मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 840 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शनिवारी 2051 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 72 हजार 963 वर पोहोचली आहे. मुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. मागील 24 तासांत मुंबईत तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 12,043 रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत.