बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याची ‘लेडी लव्ह’ अर्थात अभिनेत्री मलायका अरोरासोबत 'सिटी ऑफ लव्ह' पॅरिसमध्ये वाढदिवस साजरा करत आहे.



आज (26 जून) अर्जुन कपूरचा वाढदिवस आहे आणि हा खास दिवस तो त्याची पार्टनर मलायकासोबत आणखी संस्मरणीय बनवत आहे.



अर्जुन आणि मलायका यांनी त्यांच्या पॅरिस व्हेकेशनमधील रोमँटिक फोटो शेअर करून चाहत्यांना खास ट्रीट दिली आहे.



आता अर्जुन कपूरनेही मलायकासोबतचे त्याचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत, जे पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.



अर्जुन कपूर आणि मलायका यांचे एकमेकांवरील प्रेम आणि मजबूत बॉन्ड व्हेकेशनच्या नवीन फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.



दोघेही एकमेकांसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.



दोघांची केमिस्ट्री जबरदस्त आहे.



मलायका आणि अर्जुनचे फोटो चाहत्यांना पसंत पडले आहेत.



मलायका अरोरा देखील तिच्या डार्लिंग अर्जुनचा वाढदिवस खास बनवण्यात कोणतीही कसर सोडत नाहीये.



दोघांचे एकमेकांवरील प्रेम चाहत्यांना कपल गोल देत आहे.