सोनालीचा शाही लूक चर्चेत! हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने चाहत्यांनी मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी सोनाली ओळखली जाते. सध्या सोनाली चर्चेत आलीये ती तिच्या नव्या फोटोशूटमुळे. (Photo:@sonalikul/IG) सोनालीने या फोटोशूटमध्ये निळ्या रंगाची बनारसी साडी नेसलीये. सोनाली या लूक मध्ये फार सुंदर दिसत आहे. हिरव्या रंगाच्या कुंदन ज्वेलरी सोबत तिने हा लूक पूर्ण केलाय.