मराठमोळ्या मृण्मयी देशपांडेचा खास लुक पाहिलात? मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशापांडेने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्यांनी अनेक प्रेक्षकांनी मनं जिकली आहेत. मृण्मयीने केवळ चित्रपट, मालिकांपूरताच तिचा प्रवास मर्यादित न ठेवता ती दिग्दर्शकीय क्षेत्रात उतरली आहे. मृण्मयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. त्यामुळे अनेक वेळा ती तिचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असते. मृण्मयीने नुकतेच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. या लूकमध्ये मृण्मयी अतिशय सुंदर दिसत आहे. मृण्मयीच्या या फोटोंनी अनेकांची मने जिंकली असून सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे.