आलिया भट्ट ही सध्या बॉलीवुडमधील एक आघाडीची अभिनेत्री आलिया एप्रिल 2022 मध्ये रणबीर कपूर सोबत लग्नबंधनात अडकली. आता ती लवकरच आई होणार असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे सध्या ती टाकत असलेल्या फोटोमध्ये बेबी बंप फ्लाँट करताना दिसते. ती अगदी सिंपल लूकमध्ये दिसून येते. पण यामध्येही ती कमाल सुंदर दिसते. आताही तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती अगदी साध्या लूकमध्ये दिसत आहे. एक सिंपल ड्रेस आलियााने या फोटोंत घातला आहे. या लूकमध्येही ती प्रिटी दिसत आहे. तिच्या सर्वच फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात.