‘ब्रह्मास्त्र’(Brahmastra) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.



ब्रह्मास्त्र चित्रपटानं 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.



रविवारी (18 सप्टेंबर) ब्रह्मास्त्रच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली असून लवकरच हा चित्रपट 250 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे.



जाणून घेऊयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन



रविवारी म्हणजेच दहाव्या दिवशी या चित्रपटानं 16.25 ते 17.25 कोटींची कमाई केली आहे.



रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटानं 40 कोटींची कमाई केली.



आतापर्यंत या चित्रपटानं 209 ते 210 कोटींची कमाई केली आहे.



जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 360 कोटींची कमाई केली आहे.



2022 हे वर्ष आलियासाठी खास होते. या वर्षी तिचे आरआरआर, गंगूबाई काठियावाडी आणि ब्रह्मास्त्र हे तीन चित्रपट रिलीज झाले.



ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरसोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.