बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक सोनाक्षी सिन्हा. आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळेही ती नेहमीच चर्चेत असते. सोनाक्षी सध्या जहीर इकबाल (Zaheer Iqbal) ला डेट करत आहे. सोनाक्षी आपल्या रिलेशनशिपसोबतच आपल्या लूकसाठीही चर्चेत असते. नुकतेच सोनाक्षीनं आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. पर्पल आउटफिट्समध्ये सोनाक्षी क्लासी दिसतेय. सोनाक्षीच्या क्लासी आणि ग्लॅमरस फोटोंवर चाहते लाईक्सचा वर्षाव करताहेत फोटो शेअर सोनाक्षी म्हणते, खरंच पर्पलसोबत काहीच राइम होत नाही, हे कॅप्शन कॅन्सल झालंय फोटो शेअर करताच सोनाक्षीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर सोनाक्षीनं भुज चित्रपटात अजय देवगनसोबत स्क्रिन शेअर केली होती.