उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न विशेष म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री असतांना देखील त्यांच्या हस्ते आषाढीला विठ्ठल मंदिरात महापूजा झाली होती. दुसऱ्यांदा कार्तिकी आषाढीच्या निमित्ताने फडणवीस यांच्या हस्ते महापूजा झाली आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे हेच विठुरायाकडे मागणं असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून चारवेळा आषाढीला विठ्ठल मंदिरात पूजा केली. तर उपमुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा कार्तिकीला महापूजा करण्याची संधी मिळाली. आज पहाटे फडणवीस यांनी सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. एकदा विरोध झाल्याने फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानीच मध्यरात्री महापूजा केली होती. आता उपमुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा संधी मिळाल्याने, फडणवीस यांच्या हस्ते एकूण सातव्यांदा महापूजा झाली आहे. मराठा समाज आणि कोळी समाजाच्या प्रचंड विरोधानंतर प्रशासनाच्या मध्यस्थीने अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाची शासकीय पूजा केली.