सोहा अली खानने नवीन फोटो शूट केलं आहे. सैफ अली खानची ती बहिण आहे. अलिकडच्या काळात ती बॉलिवूडपासून दूर गेली आहे. सोहाने 'दिल मांगे मोअर' चित्रपटातून बॉलिवूड एन्ट्री केली. रंग दे बसंती मधील तिच्या अभिनयाचे कौतुक झालं. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. कुनाल खेमूसोबत तिने 2015 साली लग्न केलं. या जोडप्याला इनाया नावाची मुलगी आहे. सोहा ही प्राणी प्रेमी व्यक्ती आहे. सोहा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.