छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळे आशयाच्या मालिका होताना दिसून येत आहेत. त्यातील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका प्रचंड लोकप्रिय होत आहे. मालिकेचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढण्याचे कारण म्हणजे मालिकेतील बालकलाकार 'परी' आहे. परीचे खरे नाव मायरा वायकूळ असे आहे. केवळ सव्वाचार वर्षांच्या परीने मालिका सुरू होताच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. मायराचे स्वत:चे इन्स्टाग्राम अकाउंट आहे. मुळे सोशल मीडियावर देखील तिचा चाहतावर्ग झपाट्याने वाढत आहे. मालिकेतील नेहा आणि परीचे सीन नेहमीच प्रेक्षकांना भावतात. मायरा मालिकेत समजुतदार, समजंस, थोडीशी मस्तीखोर, लबाड दाखवली आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या सेटवर मायराचा सतत दंगा सुरू असतो. मायराची ही पहिलीच मालिका आहे.