जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील विविध भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. याचा परिणाम वाहतुकीवरही झाला आहे.
जोरदार बर्फवृष्टी आणि भूस्खलनामुळे येथील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
दोन्ही राज्यांमध्ये आतापर्यंत एकूण 176 मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.
हिमवर्षाव आणि भूस्खलनामुळे काश्मीर खोऱ्याला देशाच्या इतर भागाशी जोडणारा एकमेव 270 किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 बंद झाला आहे.
लाहौल स्पिती, किन्नौर, चंबा, कुल्लू आणि किन्नौरमध्ये गेल्या 24 तासांत मोठ्या बर्फवृष्टी झाली आहे.
लाहौल स्पिती येथे सर्वात कमी तापमान असून ते उणे 3.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. हिमाचलच्या इतर भागातही तापमान खूपच कमी आहे.
हवामान विभागाने येत्या काही दिवसांत पर्वतीय प्रदेशातील राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा येलो अलर्ट जारी केला आहे.
पर्वतीय भागात पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, सखल आणि मैदानी भागात हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे.
NH-1 वरील पंथियाल कॅफेटेरिया वळण आणि दलवासजवळ 200 हून अधिक वाहने अडकली आहेत.