बोस्टन टेरीर (Boston Terrier)

हा कुत्रा छोट्या आकाराचा असून त्याचा रंग राखाडी, काळा, किंवा तांबडा रंगाचे असतात आणि त्यावर पांढरे चट्टेही असतात.

डचहंड (Dachshund)

डचहंड कुत्र्याचे पाय इतर कुत्र्यांच्या आकाराने फारच लहान असतात. डचहंडचा आकार 20 ते 23 सेमी असतो.

यॉर्कशिर टेरीर (Yorkshire Terrier)

हा कुत्रा छोट्या आकाराचा असून त्याचा रंग राखाडी आणि तांबडा असा असतो. हे अत्यंत चपळ असतात.

माल्टीज (Maltease)

लांब फर कोट हे या कुत्र्यांचे खास वैशिष्ट्य आहे. त्यांची उंची 8-10 इंचांपर्यंत असते.

शिह त्झू (Shih Tzu)

हे आशियाई जातीचे कुत्रे असून त्यांची सरासरी उंची 9-10.5 इंच असते.

पग (Pug)

पग आकाराने लहान असतात, त्यांची सरासरी उंची 10-13 इंच आहे.

पोमेरेनियन (Pomeranian )

पोमेरेनियन कुत्र्यांची सरासरी उंची 5-8 इंच असते.

चिहुआहुआ (Chihuahua)

या जातीच्या कुत्र्याची सरासरी उंची 5-8 इंच असते. ही जगातील जगातील सर्वात लहान कुत्र्यांची प्रजाती मानली जाते.

पूडल (Poodle)

कुरळ्या केसांचा हा कुत्रा दिसायला फार गोड दिसतो. टॉय पूडलचा आकार 24 ते 26 सेमी इतका असतो.

हवानीज (Havanese)

हवानीज हा क्युबाचा राष्ट्रीय कुत्रा आहे. हे खूप उत्साही आणि चपळ असतात.

पॅपिलॉन (Papillon dog)

या लहान कुत्र्यांना त्यांच्या कानाच्या आकारामुळे बटरफ्लाय डॉग असंही म्हणतात. त्यांची सरासरी उंची 8-11 इंच असते.