अरुणाचल प्रदेश हे देशातील असं राज्य आहे जिथे दरवर्षी लाखो पर्यटक फिरण्यासाठी जातात.



तुम्हीही अरुणाचल प्रदेशात जाण्याचा विचार करत असाल तर IRCTC ने एक खास पॅकेज आणलं आहे.



तुम्ही भारतीय रेल्वेच्या IRCTC सोबत अरुणाचल प्रदेशातील सहलीचा आनंद घेऊ शकता.



या पॅकेज टूरची सुरुवात गुवाहाटीपासून होणार आहे.



या पॅकेजचे नाव अरुणाचल-गेटवे टू सेरेनिटी एक्स गुवाहाटी असं आहे.



हे पॅकेज 8 दिवस आणि 7 रात्रीसाठी आहे. तुम्ही दर शुक्रवारी या पॅकेजचा आनंद घेऊ शकता. हे पॅकेज गुवाहाटी विमानतळ किंवा रेल्वे स्टेशनवरून सुरू होईल.



या पॅकेजमध्ये तुम्हाला अरुणाचल प्रदेशातील तवांग, दिरांग आणि बोमडिला येथे जाण्याची संधी मिळेल



या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता आणि रात्रीचे जेवण दोन्हींची सुविधा मिळेल.



प्रत्येक ठिकाणी राहण्यासाठी हॉटेलची सुविधा मिळेल.



यासोबतच नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाचीही सोय असणार आहे.



या पॅकेजमध्ये एकट्याने प्रवास करण्यासाठी तुम्हाला एका व्यक्तीसाठी 44,900 रुपये, दोन लोकांसाठी 33,370 रुपये आणि तीन लोकांसाठी 30,930 रुपये मोजावे लागतील.