निरोगी जीवन जगण्यासाठी पुरेशी आणि दर्जेदार झोप घेणे आवश्यक आहे.



अनेकदा तज्ञ 7 ते 8 तास झोपण्याची शिफारस करतात. यापेक्षा कमी झोपल्यास तुम्हाला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.



पण तुम्हाला माहित आहे का की जास्त वेळ झोपल्यानेही तुमच्या शरीराचे अनेक नुकसान होऊ शकतात.



गरजेपेक्षा जास्त झोपल्याने एखादी व्यक्ती नैराश्याची शिकार होऊ शकते. PLOS च्या रिपोर्टनुसार जास्त झोपल्याने डिप्रेशन होऊ शकते.



जेव्हा तुम्ही जास्त झोपता, तेव्हा सुस्ती राहते, तुम्हाला काम करावेसे वाटत नाही. एकाग्रता कमी होते आणि त्यामुळे तुम्ही नैराश्याचे बळी ठरता.



गरजेपेक्षा जास्त झोप घेतल्याने हृदयविकाराचा धोकाही वाढतो. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, जे लोक 9 ते 11 तास झोप घेतात त्यांच्यामध्ये हृदयरोग होण्याची शक्यता 30 ते 38 टक्क्यांनी वाढते.



जेव्हा तुम्ही बराच वेळ झोपता तेव्हा सेरोटोनिनचा भरपूर स्राव होतो. अशा स्थितीत मेंदूतील काही न्यूरोट्रांसमीटरवर त्याचा परिणाम होऊ लागतो.



जास्त वेळ झोपल्याने पाठदुखी किंवा अंगदुखी होऊ शकते.



कारण जेव्हा तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्रिय असता तेव्हा तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण बरोबर नसते. त्यामुळे पाठदुखी किंवा अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.