चहापासून प्रत्येक भाजीमध्ये आल्याचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. आलं बाजारातून घरी आणल्यावर आपण ते फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवतो. पण तरीही आलं लवकर सुखतं किंवा ओलं होतं. जर तुम्हाला आलं खूप वेळापर्यंत ताजं ठेवायचं असेल तर आलं स्टोअर करण्याची योग्य जाणून घ्यायला हवी. आलं फ्रिजमध्ये ठेवणं योग्य आहे पण आलं कधीही फ्रिजमध्ये मोकळं ठेवू नका. आल्याला एका पिशवीत ठेवा. पण त्याआधी त्या पिशवीमधील सगळी हवा काढून टाकावी. त्यानंतर आलं त्यामध्ये ठेवावं. आलं तुम्ही एका कपड्यात किंवा पेपरमध्येही ठेवू शकता. जर तुम्ही आलं धुवून फ्रिजमध्ये ठेवत असला तर आधी ते पूर्ण सुखवावे. त्यानंतर आलं फ्रिजमध्ये ठेवावं.