‘केजीएफ’ आणि ‘केजीएफ 2’ फेम ‘रॉकी भाई’ अर्थात अभिनेता यश सध्या प्रचंड चर्चेत आहे. चाहत्यांना आता ‘केजीएफ 3’ची प्रतीक्षा आहे. मात्र, चित्रीकरणातून वेळ काढत अभिनेता यश सध्या सुट्टीचा आनंद घेतोय. नुकतेच त्याने स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुपरस्टार यशचा कूल लूक दिसत आहे. फोटोंमध्ये यशसोबत त्याची पत्नी राधिका देखील दिसत आहे. यावेळी सुपरस्टार यश पत्नी राधिका पंडितसोबत फिरायला गेला आहे. या फोटोंमधून त्यांच्या या रोमँटिक ट्रीपची झलक दिसत आहे. सुपरस्टार यश आणि राधिका यांनी त्यांच्या लग्नाचा 14वा वाढदिवस नुकताच साजरा केला. यादरम्यान, दोघेही एकत्र एका खास ठिकाणी फिरायला गेले होते.