अनेकदा आपण चेहऱ्याला स्कार्फ वगैरे काहीच न बांधता तसेच बाहेर पडतो. यामुळे चेहरा काळा पडतो.
अशा वेळी थोडा वेळ काढून केलेले स्किन केअर रूटीन कामी येऊ शकते आणि चेहऱ्याचा ग्लो परत येऊ शकतो.
खूप उन्हात बाहेर पडले की, त्वचेवर टॅनिंग आणि सनबर्न सारखी समस्या त्रास देऊ लागते.
चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स घालवण्याकरता अनेकजण स्क्रबचा वापर करतात. यामुळे त्वचा खराब होऊ शकते. स्क्रब वापरणे बंद करा.
अनेकदा आपण योग्य ती सनस्क्रीन निवडत नाहीत. त्यामुळे सनस्क्रीन लावून देखील त्वचेवर टॅनिंग आणि सनबर्न होतेच.
ज्यावेळी त्वचा काळी पडलेली असते,त्यावेळी व्हिटामिन सी चा वापर करावा.
चेहऱ्याचा काळेपणा लपवण्याकरता तुम्ही मेकअप करू शकता. याकरता लाईट मेकअप हा तुमच्याकरता चांगला पर्याय असू शकतो.
काळेपणाची समस्या दूर करण्याकरता दिवसातून अनेक वेळा चेहरा धुवा. यामुळे काळेपणा दूर होण्यास मदत होऊ शकते.
हळद आणि बेसन याचा फेसपॅक तुमच्या कामी पडू शकतो.
टोमॅटो आणि दही पॅक त्वचेवरील सन टॅन काढून टाकते.