मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे यांचा विवाहसोहळा २१ डिसेंबर २०२३ रोजी झाला

लग्नसोहळा चिपळूण येथे थाटामाटात पार पडला.

दोघांच्या लग्नाला मनोरंजनसृष्टीतील कलाकार व जवळच्या मित्रमंडळींनी हजेरी लावली होती.

मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

अशातच आता गायिकेने शेअर केलेला नवीन व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

मुग्धाने लग्नानंतर तिचं सासरी कसं स्वागत करण्यात आलं याचा खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

लघाटेंच्या घरी लाडक्या सुनेच्या गृहप्रवेशासाठी आकर्षक सजावट आणि फुलांची रांगोळी काढण्यात आली होती.

कोकणातील परंपरेनुसार मुग्धाचा लघाटेंच्या घरी गृहप्रवेश करण्यात आला. यावेळी दोघांनी सुंदर उखाणे देखील घेतले