मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईची धामधूम सुरु असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपासून रोहित आणि जुईली यांच्या घरी लग्नाची लगबग सुरु होती. नुकताच या दोघांचा लग्न सोहळा थाटामाटात संपन्न झाला आहे. लग्नसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता जुईली जोगळेकर हिने रोहितसोबतचे गोड फोटो शेअर केले आहेत. दोघांचे हे क्युट फोटो त्यांच्या लग्नसोहळ्यातील एका कार्यक्रमातील आहेत.