अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकर (Saiee Manjrekar) हिने बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत 'दबंग 3' या चित्रपटातून आपला बॉलिवूड डेब्यू केला.



सई मांजरेकर अभिनयासोबतच मॉडेलिंग क्षेत्रातही सक्रिय आहे. अभिनेत्री म्युझिक अल्बममध्ये देखील झळकली आहे.



मात्र, सध्या सई मांजरेकर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.



सई प्रसिद्ध बॉलिवूड निर्मात्याच्या मुलाला डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे.



नुकतीच सई मांजरेकर, निर्माते साजिद नाडियादवाला यांचा मुलगा सुभान नाडियादवालासोबत मुंबईतील एका कॅफेबाहेर स्पॉट झाली.



मात्र, ही त्यांची पहिलीच भेट नसून, अनेकदा सुभान आणि सई एकत्र दिसतात. आता त्यांच्यात प्रेम फुलत असल्याची चर्चा रंगली आहे.